पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या पद भरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यानुसार, जिल्हा परिषदेच्या गट क संवर्गाच्या 21 पदांच्या एक हजार जागांसाठी तब्बल 74,507 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. यामध्ये आरोग्यसेवक पदासाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत. या सर्व पदांसाठी भरती परीक्षा येत्या सप्टेंबर अखेरपर्यंत होण्याची शक्यता आहे.
कमी जागा असताना मात्र अर्ज हजारोंच्या संख्येने आले आहेत. कंत्राटी ग्रामसेवक पदाच्या 37 जागांसाठी 4,575, आरोग्यसेवक (पुरुष, हंगामी फवारणी) पदाच्या 128 जागांसाठी 2,898, औषध निर्माण अधिकारी पदाच्या 25 जागांसाठी 5,573, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या चार जागांसाठी 1,405 याशिवाय, कनिष्ठ सहायक लेखाच्या 16 जागांसाठी 1,940, कनिष्ठ सहायकच्या 67 जागांसाठी 7,317, पर्यवेक्षिका पदाच्या 1 जागांसाठी 161, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, ग्रामीण पाणी पुरवठा) 33 जागांसाठी 3835 उमेदवारांनी अर्ज केले आहेत.
वरिष्ठ सहायक लेखा नऊ जागांसाठी 953, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (बांधकाम, लघु पाटबंधारे) 59 जागांसाठी 4,873 आणि रिगमन दोरखंडवाला या पदाच्या एका जागेसाठी 123 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तसेच विस्तार अधिकारी (पंचायत) पदाच्या तीन जागांसाठी 1,784, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) दोन जागासाठी 879, विस्तार अधिकारी (कृषी) दोन जागांसाठी 193, विस्तार अधिकारी (शिक्षण) दोन जागांसाठी 144, वरिष्ठ सहायकच्या आठ जागांसाठी 5,031, पशुधन पर्यवेक्षकच्या 30 जागांसाठी 463, कनिष्ठ आरेखकच्या दोन जागांसाठी 68, कनिष्ठ लेखा अधिकारी तीन जागांसाठी 213 उमेदवारांनी अर्ज केला आहे.