जेजुरीः सध्या पावसाचे दिवस असल्याने नागरी भागांमध्ये सर्प आढळून येत आहेत. खरंतर सर्पाला पकडून त्यांना निसर्गिक अधिवासात सर्पमित्रांकडून सोडण्यात येते. परंतु, अनेक ठिकाणी सर्प पकडण्साठी गेलेल्या सर्पमित्रांना सर्पदंश झाल्याच्या अनेक घडत आहेत. या घटनांमध्ये अनेक सर्पमित्रांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. जेजुरी शहरात गेल्या अनेक वर्षांपासून सर्पमित्र उन्मेश बारभाई हे सर्प पकडून त्या सर्पांना निसर्गिक अधिवासामध्ये सोडण्याचे काम करीत आहेत. त्यांच्या मते सर्पाला हात न लावता स्किटच्या साह्याने पकडावे, यामुळे सर्पदंश होत नाही.
यासंबधिचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला असून, शहरातील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्विमिंग आढळून आलेल्या घोणस प्रजातीच्या सर्पाला पूलमध्ये पकडून त्याला निसर्गामध्ये मुक्त करण्यात आले. सर्व सर्पमित्रांनी सापाला हात न लावता त्याला स्टिकने व्यवस्थित पकडून त्याच्या निसर्गिक अधिवासात सोडावे असे म्हटले आहे. तसेच गेल्या काही काळामध्ये सर्पमित्रांच्या चुकीच्या पकडण्याच्या पद्धतीमुळे कित्येक सर्पमित्रांचा सर्पदंशामुळे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे म्हटले आहे.