विक्रम शिंदे| राजगड न्युज
भोर (दि.२१) कंत्राटी भरती वरून महाराष्ट्रातील लाखो बेरोजगार तरुणांची दिशाभूल महाविकास आघाडीने केली असून त्याचा निषेध करण्यासाठी आज (दि.२१) शहरातील राजवाडा चौकातील तहसीलदार कार्यालय परिसरात तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंत्राटी भरतीचा निर्णय करण्यात आला होता.
कंत्राटी पद्धत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणल्याचे सांगून महाविकास आघाडीतील नेते सरकारला दोष देत आहेत.या उलट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनाचा कंत्राटी भरतीचा आदेश रद्द केल्याने लाखो युवकांना दिलासा मिळाला आहे.महाविकास आघाडी काळात सुरू झालेली कंत्राटी भरती पद्धत महाविकास आघाडीचे पाप होते असा हल्ला बोल भाजप तालुकाध्यक्ष जीवन कोंडे यांनी केला.
तहसीलदार सचिन पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष जीवन कोंडे,राजेंद्र गुरव,संतोष लोहोकरे,सचिन कन्हेरकर,आशा शिवतरे,पल्लवी फडणीस,साठे मॅडम,डॉ. नागेंद्र चोबे,सुरेश कांबळे,भारत देशमुख, अमर ओसवाल, आंबडकर मॅडम,ॲड कपिल दूसंगे,श्वेता अडसूळ,मंगल शिरवले समीर घोडेकर,गोरख बांदल, अमोल पिलाने,निलेश कोंडे, मंगेश शिंदे,किरण दानवले,विशाल दूसंगे आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.