निषेधाचे निवेदन भोर पोलीस स्टेशनकडे सादर
भोरला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष भोर तालुक्याच्या वतीने मंगळवार (दि ७) रोजी महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवारी नाशिक येथे शेतकऱ्यांची थट्टा करीत शेतकऱ्यांच्या विरोधात जे बेताल वक्तव्य केलेले आहे त्याच्या निषेधार्थ भोर पोलिस स्टेशन येथे निषेध निवेदन पत्र देऊन जाहीर निषेध नोंदविण्यात आला.
या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शैलेश वालगुडे ,जिल्हा संघटक माऊली शिंदे, युवासेना जिल्हा अधिकारी आदित्य बोरगे,भोर तालुकाप्रमुख हनुमंत कंक, भोर तालुकाप्रमुख शरद जाधव, उपतालुकाप्रमुख श्रीकांत लिम्हण, विभाग प्रमुख, विजय सातपुते, दिपक धामुणसे, शहर प्रमुख आप्पा काटकर, शिवसैनिक आनंदा गोळे , शिवसैनिक विकास बांदल, शंकर पडवळ, शिवदूत विष्णू दानवले, शिवसैनिक शंकर मांढरे, शिवसैनिक ,संदीप राजवडे, माजी भोर शहर प्रमुख काका शेटे, उपशहर प्रमुख चंदन कोळसकर, शिवसैनिक संजय सणस, आदींसह पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते .