पेण प्रतिनिधि :किरण बांधणकर
पेण : आदिवासी समाजात कॅन्सर बाबत असलेले गैरसमज. विडी, तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणारे कॅन्सर व महिलांना स्तन कॅन्सर किंवा अंतर्भागाचे कॅन्सर असताना त्याचे लक्षने माहिती नसल्यामुळे आणि गैरसमाजामुळे या समाजात कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे हे लक्षात घेवून डॉ.राखी धिंग्रास पिस एन्ड एज्युकेशन ट्रस्ट आणि ग्राम संवर्धन सामाजिक संस्था बांधांवाडी यांच्या वतीने रविवारी (८ऑक्टोंबर) रोजी पेण तालुक्यातील तांबडी ठाकूरवाडी या आदिवासी वाडीत टाटा मेमोरियल सेंटर खोपोली यांच्या सहकार्याने कॅन्सर जनजागृती शिबिर घेण्यात आले.
यावेळी ग्राम संवर्धनचे अध्यक्ष रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर डॉ. राखी धिंग्रा, टाटा मेमोरियल सेंटर कॅन्सर प्रतिबंध विभाच्या प्रकल्प व्यवस्थापक डॉ. प्रतिभा पाटील, स्नेहल डी.के., सामाजिक कार्यकर्त्या मानसीताई पाटील, सुनिल वाघमारे. राजू पाटील, संदीप पाटील आणि समुपदेशक मृणाल शिंत्रे,मंगल वाघमारे, जनीबाई खाकर.
यशवंत खाकर,हरिश्चन्द्र खाकर, नरेश कडू, गीता वाघमारे यांच्यासह तांबडीतील बहुसंख्य आदिवासी महिला पुरुष उपस्थित होते. आदिवासी बांधवांनी इच्छा दर्शविल्यास वकरच मोफत कॅन्सर निदान शिबिर लावण्यात येणार असून टाटा मेमोरियल सेंटर कॅन्सर विभागाची सर्व वैद्यकीय टीम यावेळी उपस्थित राहील असे डॉ. प्रतिभा पाटील यांनी सांगितले.