पेण प्रतिधिनि |किरण बांधणकर
धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण नको आंदोलकांची प्रमुख मागणी
पेण : धनगर समाजाला अनुसुचित जमाती प्रवर्गात आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह विवीध मागण्यासाठी रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
याशिवाय आदिवासी समाजाचे आरक्षण अबाधित रहावे, सरकारी नोकऱ्यांचे, शाळांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय मागे घ्यावा , रायगड जिल्ह्यातील दळी जमिनींचा प्रश्न सोडवून, त्याचे सातबारे दळी धारकांच्या नावे करण्यात यावेत.
पेसा कायद्याची अमंलबजावणी करावी यासारख्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. या मोर्चात साडे चार ते पाच हजार आदिवासी बांधव सहभागी झाले होते.