पारगांवः धनाजी ताकवणे
सध्या पुणे जिल्ह्याच्यासह विविध भागात मोठ्या प्रमाणवर पाऊस कोसळत आहे. यामुळे पावसाचे पाणी अनेक भागात साचत आहे. पावसाचे वातारण असल्याने नागरिक घराबाहेर पडताना रेनकोट, छत्री आदींचा वापर करीत आहेत. अशा परिस्थिमध्ये दौंड तालुक्यातील पारगाव (सा. मा.) या गावात श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आरती व पूजा पाऊस असताना देखील नित्यनियमाने निर्विघ्नपणे पार पडत आहे.
अनेक वर्षांपासून शिवरायांची रात्री ८ वाजून १५ मिनिटांनी नित्य आरती व पूजा अखंडपणे सुरू आहे. मागील चार दिवसांपासून पारगांव परिसरात जोरदार पाऊस पडत आहे. २४ सप्टेंबरच्या दिवशी रात्रीची आरती व पूजा दरम्यान पाऊस सुरू असताना देखील या परंपरेला खंड पडू नये, म्हणून शिवप्रेमी हेमंत शितोळे या तरुणाने भर पावसात शिवरायांची आरती घेतली.
आपली सेवा छत्रपतींच्या चरणी अर्पण केली. हे महान कार्य व अखंड सेवेत सिंहाचा वाटा उचलणारे बाल शिवभक्त श्रीशा अमोल बोत्रे, शिवन्या अमोल ताकवणे, सानिका पांडुरंग ताकवणे, काव्या संदीप ताकवणे, आराध्या अजय ताकवणे हि नित्य शिवरायांची आरती सेवा करत असतात. यामुळे त्यांचे सोशल मीडियावर आणि पारगाव परिसरात व तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे.