शिक्रापूर/ शेरखान शेख
केंदूर ता. शिरुर येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन जयंती व शिक्षक दिन पालकांनी अनोख्या पद्धतीने साजरा करत पालकांनीच मुख्याध्यापक व शिक्षकांची भूमिका बजावत अनोख्या पद्धतीने शिक्षक दिन साजरा केला.
येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे विद्यार्थ्यांच्या पालकांनी एकत्र येऊन शिक्षकदिनी शाळा चालविण्याची इच्छा व्यक्त करताच प्राचार्य अनिल साकोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी पालकांनी शिक्षकदिनी शिकविण्याच्या, शाळा चालविण्याच्या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला.
दरम्यान, पालकांतून मुख्याध्यापक झालेले श्रीहरी पऱ्हाड यांनी भौतिक, शैक्षणिक प्रगतीविषयी सर्वांना माहीती दिली. तर पालकांतून शिक्षक झालेले झालेल्या शिक्षकांनी वर्गात दिवसभर उभे राहून शिकविणे हे कठीण काम असल्याचे सांगत अनेक अडचणींचा पाढाच वाचला. त्यामुळे शिक्षकांचे कार्य खरोखरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकांमधून मुख्याध्यापक श्रीहरी पऱ्हाड, पर्यवेक्षक संदीप सुक्रे, शिक्षक सतिश थिटे, योगिता थिटे, मयुरी खर्डे, स्वप्नील थिटे, कविता गावडे, कोंडीभाऊ थिटे, ऋतुजा साकोरे, रेश्मा गावडे, जयश्री ताठे, वंदना साकोरे, शिला सुक्रे, अश्विनी सुक्रे, सुवर्णा सुक्रे, पुजा थिटे, आशा दळवी, उज्ज्वला ताठे, मनिषा थिटे, बाजीराव भोसुरे, दिपाली थिटे, प्रतिमा भोसुरे यांसह आदी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य अनिल साकोरे यांसह आदी शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शरद बँकेचे संचालक अजय घुले, शिरूरच्या माजी उपसभापती सविताताई पऱ्हाड, सरपंच अमोल थिटे, पाबळचे सरपंच सचिन वाबळे, शाहुराज थिटे, शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सतिश थिटे, शिक्षक पालक संघ उपाध्यक्ष संदीप सुक्रे, माता पालक संघ उपाध्यक्ष मयुरी खर्डे, भाऊसाहेब थिटे, भरतशेठ साकोरे यांसह अन्य पदाधिकारी होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सतिश थिटे यांनी केले, तर मयुरी खर्डे यांनी आभार मानले.