भोर प्रतिनिधी -कुंदन झांजले
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय आणि ग्रामपंचायत बारे खुर्द (ता.भोर) यांच्या संयुक्त विद्यमानाने एक दिवसीय मोफत कायदेशीर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन बुधवार(दि १३)केले होते. या शिबिरात जमिनींचे अधिकार, पीक विमा, इच्छापत्र ,कौटुंबिक हिंसाचार ,महिला आरोग्य ,बँकिंग केसेस, विधी सेवा प्राधिकरणाची कायदेविषयक सविस्तर माहिती दिली. तसेच पर्यावरण या विषयादेखील विद्यालयातील विद्यार्थ्याकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले . या शिबिरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करून विविध विषयांवर परिसंवाद ठेवण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी वेगवेगळी प्रात्यक्षिकेही सादर केली. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कौटुंबिक हिंसाचार आणि तंटामुक्ती अधिकारी यांची भूमिका भाष्य करणारे पथनाट्य ही सादर केले.
या मार्गदर्शन शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .प्रसन्न देशमुख यांच्या वतीने प्रा.के.जी. चव्हाण उपस्थित राहिले होते .या शिबिरासाठी विशेष मार्गदर्शन ॲड अशोक पलांडे, नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ सुनिता आढाव,ॲड राकेश कोंडे ,ॲड संजय कोचळे पसुरेचे मनोज धुमाळ गावातील ग्रामस्थ ,ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन गावच्या विद्यमान सरपंच सविता संदिप गायकवाड आणि उपसरपंच सुरेश खुटवड यांच्या मार्गदर्शनाखाली केले होते. या शिबिराची संकल्पना राष्ट्रीय सेवा योजना,कायदेशीर सल्ला केंद्र श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय आणि जागृती प्रो बोनो क्लबच्या माध्यमातून साकारली गेली होती .यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या अधिकारी सहा.प्रा.नीता अहिर ,सहा प्रा.अजिंक्य वाघमारे , लक्ष्मण बदक आणि प्रो बोनो क्लबच्या प्रमुख डॉ. ऐश्वर्या यादव आणि त्यांच्या सहकारी सहा. प्रा. पूजा देव यांनी विशेष परिश्रम घेतले . या एकदिवसीय मोफत कायदेशीर मार्गदर्शन शिबिराला ग्रामस्थांकडून उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.