शिरवळ : शिरवळ (ता. खंडाळा) येथील जलजीवन मिशन योजनेचा प्रश्न पेटला असून त्याची ठिणगी आता मुबई आझाद मैदान येथे पडली असून आझाद मैदान मुंबई येथे शिरवळ ग्रामस्थ उपोषणासाठी बसले आहेत .योजनेंतर्गत मंजूर असलेल्या ठिकाणी नळ पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करण्यात यावी व राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या कामकाजा संदर्भात पप्पू कांबळे, इम्रान काझी, केदार हाडके व सुदाम तात्या कांबळे हे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी उपोषणास बसले आहेत.
केंद्र सरकार पुरस्कृत जलजीवन मिशनअंतर्गत ४ कोटी ७३ लाख रुपये मंजूर असलेल्या शिरवळ नळ पाणीपुरवठा योजना मंजूर असलेल्या ठिकाणी तातडीने सुरू करण्यात यावी, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल (२०१८-२०१९) योजनामधील शिरवळ (ता. खंडाळा) येथील नळ पाणीपुरवठा योजना १ कोटी ४३ लाख रुपये योजनेची चौकशी करावी, या मागण्या उपोषणकत्यांनी केल्या.