भोर : जि.प. प्राथमिक शाळा न्हावी येथे शैक्षणिक वर्ष 2024/25 च्या शुभारंभानिमित्त एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत ट्रॅक्टर मिरवणुकीद्वारे करण्यात आले यावेळी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक, महिला, ग्रामस्थ, युवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला नवगतांचे स्वागत ट्रॅक्टरमध्ये मिरवणूक करून करण्यात आले. त्यानंतर, शाळेतील सर्व मुलांना सेवा सहयोग फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने नवीन दप्तर आणि शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. मंगलांजली किडनी संजीवन फाऊंडेशन पुणे आणि नवज्योत परिवार ट्रस्ट पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्रत्येकी 7 वह्या, चित्रकला वही, रंगपेटी आणि खाऊ वाटप करण्यात आले.
ग्रामपंचायत न्हावी 15 चे सरपंच भरत सोनवणे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्यात आले आणि सर्व मुलांना पुस्तके वाटप करण्यात आली. इयत्ता पहिली आणि शाळेत नवीन दाखल झालेल्या मुलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमासाठी भरत(आण्णा)सोनवणे, दत्तात्रय कारळे, डॉ.सुमेघा मादळे, अंकुश(आण्णा) चव्हाण, सचिन सोनवणे, शरद सोनवणे, निलेश सोनवणे, अनिकेत भोसले, प्रमोद सोनवणे, अविनाश भोसले, निलम सोनवणे, कोमल सोनवणे, पूनम सोनवणे, सोनाली बोन्द्रे, पूजा खोमणे, संगिता सोनवणे, पूजा सोनवणे, मनिषा लोहोमकर, सारिका मोहिते आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक संदिप मोरे यांनी केले, सूत्रसंचालन शाळेचे उपशिक्षक अनिल चाचर यांनी केले तर आभार रुपाली पिसाळ यांनी मानले.