मुंबईः भाजपच्या कोअर किमिटीची बैठक येथे संपन्न झाली. या बैठकीत विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. फडणवीस यांची गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सर्वांचे आभार मानले. यामुळे आता राज्याचे तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदी विराजमान होणार आहेत. उद्या दि. ५ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ फडणवीस घेणार आहेत. जनतेने दिलेला हा विजय अभूतपूर्व असून आता जबाबादारी वाढली असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. यावेळी लाडक्या बहिणींचा भाऊ देवाभाऊ अशा घोषणा देण्यात आल्या.
एक है तो सैफ है मोदी है तो मुन्कीन है असा नारा फडणवीस यांनी भाषणावेळी दिल्याने सर्व आमदारांनी त्यांना अनुमोदन दिले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेत्तृवात विजयाची मालिका राज्यात झाल्याने महाराष्ट्राच्या जनतेला साष्टांग दंडवत करून सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो, असे फडणवीस यावेळी म्हणाले. ही बैठक भाजपचे निरीक्षक देशाचे वित्तमंत्री निर्मला सितारामण आणि मा. मुख्यमंत्री विजय रुपानी यांच्या निरीक्षणाखाली पार पडली. फडणवीस यांच्या नावाला भाजपच्या १३२ आमदारांनी सर्वानुमते अनुमोदन दिले.