नाशिक: शहरात पती-पत्नीने आपल्या ७ वर्षांच्या मुलीची हत्या करुन त्यानंतर आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे नाशकात मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना मुलगी शाळेत जाण्यासाठी बाहेर आली नाही, म्हणून तिला पाहिला गेलेल्या आजोबांना कुणीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर सदर घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय माणिक सहाने हे नाशिकच्या गौळने गावचे असून ते पाथर्डी फाटा, सराफ नगर परिसरात राहत होते. त्यांनी आपल्या ९ वर्षांच्या मुलीला विष पाजले. त्यानंतर पती-पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली. मुलीला औषध पाजून बेडवर झोपवले आणि नंतर दोघांनी गळफास घेतला. मयत विजय सहाने यांच्यावर कोणत्याही स्वरुपाचे कर्ज नाही. मग त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणावरुन असा प्रश्न निर्माण झाला आहे. आत्महत्या करण्याच्या एक दिवस अगोदर त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे देवदर्शन करुन ते घरी परतले होते. त्यानंतर पहाटे ही आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे.
आजोबांमुळे घटना आली उघडकीस
शाळेची गाडी मुलीला नेण्यासाठी आली, त्यावेळी मुलगी खाली आली नाही. म्हणून आजोबांनी वर जाऊन बघितल तर दरवाजा आतून बंद होता. आजोबांनी दूध टाकण्यासाठी येणाऱ्या दूधवाल्याच्या मदतीने दरवाजा बंद दरवाजा उघडला. त्यावेळी पती-पत्नीने गळफास घेतला असल्याचे आढळून आले. विजय यांच्या घरातील कपाटात दहा लाख रुपये रोख रक्कम आणि सोने मिळून आले आहे. मात्र अद्याप आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.