मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राजभवनावर जात राज्यपाल यांच्याकडे सूपूर्त केल्यानंतर राज्यपाल यांनी शिंदे यांची आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी दिली आहे. यामुळे आता राज्यात सत्तास्थापनेच्या हालचाली वाढू लागल्या असून, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर दिल्लीत शिक्कामोर्तेब झाल्याची माहिती आहे. येत्या २ डिसेंबरला शपथविधी सोहळा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. याच दिवशी २० आमदारांचा मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते व आमदार दिपक केसकर यांनी मुख्यमंत्री पदाचा निर्णय मोदी, शहा घेतील तो सर्वांना मान्य राहिल असे सूचक विधान केसकर यांनी माध्यमांशी बोलताना केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा देणे ही फॅारम्यॅली असते. त्यानुसार त्यांनी राज्यपाल यांच्याकडे राजीनामा सूपुर्त केला आहे. म्हणून ते आता राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री असणार आहे. तसेच येत्या काही दिवसांत राज्यात नवे सरकार येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. प्रत्येक पक्षातील आमदारांना वाटते की आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री असावा असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. भाजपच्या गटनेते पदाची निवडीच्या बैठकीनंतर तिन्ही पक्षाची एकत्रित बैठक होणार आहे. त्यानंतर जो निर्णय मोदी, शहा घेणार तो निर्णय सर्वांना मान्य असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. त्यामुळे तिन्ही नेत्यांनी ही गोष्ट वरिष्ठ नेत्यांवर सोपवली असल्याचे देखील त्यांनी सांगितले.