राजगड न्युज नेटवर्क
भोर, ता. १५ : भोर तालुक्यातील पूर्व भागातील राजगड सहकारी साखर कारखान्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने बँकेने तारण ठेवलेल्या मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा घेतला, कर्जदार व जामीनदार यांच्याकडून कर्जाच्या वसुलीसाठी त्या मालमत्तेची बँक ऑफ महाराष्ट्राच्या पुण्यातील सोमवार पेठ शाखेकडून मंगळवारी (ता. १७) ई लिलावाद्वारे विक्री केली जाणार आहे.
राजगड कारखान्याने बँक ऑफ महाराष्ट्राकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम ५५ कोटी १ लाख ३० हजार ९६३ रुपये व त्यावरील ३० जून २०१८ पासूनचे व्याज इतर आकार येणे बाकी आहे.कर्ज परतफेड होत नसल्याने मालमत्तेचा ई लिलावाद्वारे विक्री करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. त्यासाठी राखीव किंमत ११९ कोटी २ लाख रुपये ठरवण्यात आली आहे, तर लिलावासाठी बयाणा रक्कम ११ कोटी ९० लाख २० हजार ठरविण्यात आली आहे. ई लिलावाची तारीख १७ नोहेंबर असून , सकाळी ११ ते दुपारी ते ४ वाजेपर्यंत हा लिलाव होणार आहे.याबाबत बँकेच्या वतीने जाहीर नोटीस दिली आहे. तत्पूर्वी १३ ऑक्टोबर रोजी दुपारी अडीच ते पाच वाजेपर्यंत मालमत्ता पाहणीची वेळ ठरवण्यात आली होती.
कशाचा होणार लिलाव
या कर्जासाठी कारखान्याने मालकीच्या गट नंबर २९४ / १, २९५, ३०४, ३०५, ३१५/१, ३१६ ते ३२२, ३३७ ते ३३९, ३४२ ते ३५४, ३५७, ३६० ते ३७२ मधील जमिनीचे क्षेत्रफळ अंदाजे ८९ एकर, तसेच फॅक्टरी, ऑफिस व गोदामाचे बांधकाम.
कारखाना सुरू होतो की नाही शेतकऱ्यांच्या पुढे पडला प्रश्न
राजगड सहकारी कारखान्यावर निलावाची कारवाई करण्यात आली या नीलावाची कारवाईमुळे कारखाना अध्यक्ष व आमदार संग्राम थोपटे यांनी सर्वसाधारण सभेत जाहीर केलेल्या निर्धारानुसार कारखाना सुरू होतो की नाही, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.