भोरः मारुती आबा गोळे यांच्या मार्गदर्शना खाली आग्रा ते राजगड तसेच श्रीमान रायरेश्वर प्रतिष्ठाना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने
राजगड ते रायरेश्वर असे पायी शिवज्योत मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या इतिहासातील सर्वाधिक महत्त्वाची घटना म्हणजे आग्रा भेट आणि आग्राहून क्रूर-अत्याचारी औरंगजेबाच्या तब्बल ९९ दिवसांच्या कैदेतून राजगडाच्या दिशेने महाराजांनी घेतलेली गरुडझेप! त्यामुळे गेली चार वर्ष ही मोहीम राबवली जात आहे.
राजांच्या या पराक्रमाला अभिवादन, या देदीप्यमान इतिहासाचे स्मरण आणि आजच्या तरुण पिढीपर्यंत हा जाज्वल्य इतिहास पोहोचवण्यासाठी हातात धगधगती शिवज्योत घेऊन शेकडो मावळ्यांनी आग्रा ते राजगड तब्बल १२५३ किलोमीटरचे अंतर १७ ऑगस्ट ते २९ ऑगस्ट २०२४ या १३ दिवसांमध्ये धावत पूर्ण केले आहे. तसेच आपल्या भोर भागाला लाभलेला ऐतिहासिक ठेवा पाहता मावळ्यांनी याचा आदर्श घ्यावा, म्हणून राजगड ते रायरेश्वर अशी २ दिवसाची पायी शिवज्योत मोहिम २९ऑगस्ट रोजी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या दुधाई वीर धाराऊ माता गाडे पाटील यांच्या पुण्यभूमिमध्ये स्वागत करण्यात आले.
यावेळी सर्व शिवभक्तांना महाप्रसाद देण्यात आला तसेच रायरेश्वर प्रतिष्ठानच्या सर्व शिलेदारांचे स्वागत करण्यात आले. गणेश उपाळे यांच्या राजगड (वेल्हा) तालुक्यातील एकमेव असलेली लोकार्पण अकॅडमीचे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी या शिवज्योतमध्ये सहभागी नोंदविला. त्यांचेही ग्रामस्थांच्या वतीने व धाराऊ माता गाडे पाटील स्मारक ट्रस्टच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी धाराऊ माता टस्ट्र आध्यक्ष अमित दादा गाडे पाटील, बाबुराजे गाडे पाटील, मयुर गाडे पाटील, गोरख आहिरे, पांडुरंग गाडे पाटील, अक्षय गाडे पाटील, सचिन वीर, आमर गाडे पाटील, प्रवीण देवघरे सर्व ग्रामस्थ व सर्व मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.