राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)

E-Paper
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
Menu
  • महाराष्ट्र
    • शहर
    • पुणे
    • सातारा
  • राजकीय
  • सामाजिक
  • खेळ
  • क्राईम
  • संपादकीय
E-Paper
  BREAKING NEWS
६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई 2 weeks ago
जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद 2 weeks ago
बेकायदा मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर ट्रस्ट सचिवासह दोघांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल 3 weeks ago
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती 1 month ago
“तुम्ही आमच्यावर केसेस करणार मग आम्ही तुम्हाला सोडणार का” उद्योजकाच्या मुलाचे अपहरण… 1 month ago
Next
Prev
Home पुणे

आधुनिक बायोगॅसमुळे मिळणार सेंद्रिय शेतीला चालणा…!

भोर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आधुनिक बायोगॅस प्रकल्पाचा लाभ

by Team Rajgad Publication
February 5, 2025
आधुनिक बायोगॅसमुळे मिळणार सेंद्रिय शेतीला चालणा…!
0
SHARES
1.5k
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नसरापूर : भोर तालुक्यातील शेतीला आधुनिक आणि सेंद्रिय शेतीला चालना मिळावी तसेच शेतकऱ्यांना आर्थिक व शेतीविषयक फायदा मिळावा, यासाठी करंदी येथे २५ शेतकऱ्यांना आधुनिक बायोगॅस प्रकल्पांचे वाटप करण्यात आले. हा प्रकल्प गावांच्या शाश्वत विकासासाठी आश्वासक ठरत असून, पर्यावरणपूरक उर्जेच्या वापरामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे.

यावेळी बारामती इको सिस्टीम्स ॲन्ड टेक्नॉलॉजी प्रा. लि. चे संस्थापक अभिमन्यु नागवडे, संचालक गौरव जगताप, प्रतिनिधी गणेश भुजबळ, तसेच भोर येथील बायोगॅस लाभार्थी नवनाथ गायकवाड, शशिकांत गायकवाड, अनिल गायकवाड, विलास गोळे, बाबासाहेब गोळे, उत्तम बोरगे, दीपक बोरगे, ऋषिकेश बोरगे, अंजली साबळे आणि स्थानिक ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.

You might also like

No Content Available

१८५ शेतकऱ्यांना बायोगॅस प्रकल्पाचा लाभ

भोर, पुरंदर, राजगड, खेड, आंबेगाव या तालुक्यांतील एकूण १८५ गरजू शेतकऱ्यांना पुण्यातील नामांकित पर्सिस्टंट फाउंडेशनच्या CSR माध्यमातून आधुनिक बायोगॅस संयंत्र देण्यात आले. ज्या शेतकऱ्यांकडे २-३ देशी गायी आहेत, त्यांना ४५,००० रुपये किमतीचे बायोगॅस संयंत्र फक्त १०,००० रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे संयंत्र २५ वर्ष टिकाऊ असून, शेतकऱ्यांना स्वयंपाकासाठी मोफत इंधन उपलब्ध होते, त्याचबरोबर खतांवरही मोठी बचत होते.

पर्यावरणपूरक आणि आर्थिकदृष्ट्या फायदेशीर उपक्रम

बायोगॅसच्या वापरामुळे शेतकऱ्यांना दरमहा २,००० रुपये इंधन खर्चात बचत होत आहे. तसेच, बायोगॅस स्लरीपासून ४ ते ५ एकर शेतीसाठी लागणारे सेंद्रिय खत शेतकरी स्वतः तयार करू शकतात, त्यामुळे वर्षाकाठी ७० ते ८० हजार रुपये खतांच्या खर्चात बचत होत आहे. यामुळे या तालुक्यांतील सर्व शेतकरी शाश्वत सेंद्रिय शेतीकडे वळत असून, विषमुक्त अन्नधान्याचे उत्पादन घेत आहेत.

बायोगॅस प्रकल्पामुळे महिलांना दिलासा

एलपीजी गॅसच्या वाढत्या किमतीमुळे ग्रामीण भागातील महिलांना अडचणी येत होत्या. मात्र, बायोगॅसमुळे या समस्या सुटल्या असून, धुरामुळे होणारे डोळ्यांचे आजारही टळणार आहेत. तसेच, गावांतील वृक्षतोड थांबून अपारंपरिक ऊर्जेस चालना मिळणार आहे.

या उपक्रमासाठी बारामती इको सिस्टीम्स ॲन्ड टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीचे मोठे योगदान असून, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ पद्मश्री, पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांचे मार्गदर्शन तसेच पर्सिस्टंट कंपनीच्या CSR प्रमुख योगिता आपटे आणि वैभव निकम यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

“बायोगॅस संयंत्र बसवल्यामुळे आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम झालो असून, इंधन व खतांच्या खर्चात मोठी बचत होत आहे. पर्यावरणपूरक शेती आणि प्रदूषणमुक्त ऊर्जेच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा आहे,” असे समाधान व्यक्त करत लाभार्थी शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

Tags: Krushi
ShareTweetSend
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

No Content Available

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: वेनवडी येथे आर्थिक वादातून युवकाची निर्घृण हत्या

February 9, 2025
धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

धक्कादायकः २ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; मुलीच्या आईला कोयत्याचा धाक दाखवून पलायन, अल्पवयीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात

September 17, 2024
राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

राजगडः ‘तो’ अपघात नव्हेच, नातेवाईकांचा आरोप खरा ठरला; अंद्धश्रद्धेतूच झाला खून? 

September 25, 2024
Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

Breaking News: खेड-शिवापूर टोलनाक्यावर ५ कोटी रुपयांची रोख रक्कम नेणारे वाहन पोलिसांनी पकडले; पकडलेले वाहन सत्तेतील बड्या आमदाराचे? 

October 21, 2024

Bhor Newsसावधान!!हवामान खात्याचा अतिवृष्टीचा इशारा ,पुन्हा एकदा शाळांना सुट्टी जाहीर.

0

पहिल्या वेतनाच्या रकमेतून बालचमुंना दाखविला “डंका हरिनामाचा” सिनेमा

0

Bhor News सावधान||भोर तालुक्यातील वरंधा घाट माथ्यावर अतिवृष्टी,या भागातील धानवली गावातील नागरिकांचे स्थलांतर

0

Bhor Breaking News पसुरेत वीजेच्या खांबावरून घसरून वायरमन जखमी

0
६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

६ वर्षांपासून फरार असलेला आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई

March 28, 2026
जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद

जांभळी येथे हॉटेलमधील कामगाराकडून वृद्धाचा खून; मोबाईलच्या कारणावरून वाद, ६ तासांत आरोपी जेरबंद

March 25, 2026
बेकायदा मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर ट्रस्ट सचिवासह दोघांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल

बेकायदा मधमाशांचे पोळे काढल्याप्रकरणी बनेश्वर ट्रस्ट सचिवासह दोघांवर वनविभागाकडून गुन्हा दाखल

March 23, 2026
संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

संग्राम थोपटेंना सलग तिसऱ्यांदा अपयश;भोर पंचायत समितीवर राष्ट्रवादीची सत्ता, ‘चिठ्ठी’ने ठरला सभापती

March 9, 2026

Recent News

मुख्य संपादिका - वर्षा गायकवाड-सोनवणे
+91 7719020202
rajgadnews@gmail.com

URN : UDYAM-MH-26-0239825

Copyright © 2026 राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.) | Powered by राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क www.rajgadnews.live ‘राजगड न्युज’ आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. Copyright:  लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
About us
Privacy Policy
Grievance Redressal Policy
Fact Checking Policy

Add New Playlist

error: Content is protected !!
No Result
View All Result

Copyright © 2023 Rajgad news.live