वसई: येथील नालासोपारामध्ये १६ वर्षीय मुलीवर दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच याचे व्हिडिओ रिकार्डिंग करुन कोणाला काही सांगतल्यास सदर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी पीडितेला दिली असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, दुसरा आरोपी फरार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नालासोपाऱ्यात राहणाऱ्या अनिस शेख (वय 23) या तरुणाशी पीडित मुलीची ओळख होती. त्याने 2 सप्टेंबर रोजी नालासोपाऱ्यात तिला बोलावून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर 5 सप्टेंबरला तिला पुन्हा नालासोपाऱ्यात बोलावले. सनसाईन उद्यानात आरोपी अनिस शेख आणि त्याचा मित्र जियान या दोघांनी तिच्याशी लगट केली. तिला दुचाकीवर बसवून अर्नाळा येथील एका लॉजमध्ये नेत अनिस शेख याने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी दोन्ही आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
जियान याने याचे त्याच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ रेकार्डिंग करुन हा प्रकार कुणाला न सांगण्याची धमकी देत पीडितेला मारहाण केली. असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी अनिस शेख या आरोपीला अटक केली असून, दुसरा आरोपी फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत असल्याची माहती पोलिसांनी दिली आहे.