निवडणूक आयोगाने राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, निकाल २३ नोव्हेंबर रोजी असणार आहे. तसेच राज्यात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली जाणार आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकींच्या तारखांसोबत कोणत्या दिवशी ड्राय डे असणार आहे हे देखील सांगितले आहे.
‘या’ दिवशी असणार आहे ड्राय डे
- 1 नोव्हेंबरला दिवाळी
- 12 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी
- 15 नोव्हेंबर गुरूनानक जयंती
18 नोव्हेंबरला संध्याकाळी 5 वाजल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावतील, त्या दिवसापासून 20 नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मद्याची दुकाने बंद राहणार आहेत. तसेच 23 नोव्हेंबरला निकाल असल्यामुळे त्या दिवशी देखील ड्राय डे असणार असल्याचे सांगण्यात आले आहे.