आपला देश विविधतेने नटलेला आहे, तसा देशात असणाऱ्या विविध राज्यातील राजकारणाने देखील विविधतेने नटलेले आहे. असं म्हटलं तर चुकीचं वाटू नये. आपल्याकडे म्हणजेच महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका जमतेम काही दिवसांवर आल्या असून, सर्वच राजकीय पक्षांनी राजकीय रणनीती आखण्यास सुरूवात केली आहे. युती आणि आघाडीतील जागावाटपाचा पेच जवळपास सुटलेला आहे. दिवाळीनंतर प्रचाराला खऱ्या अर्थाने वेग प्राप्त होणार आहे, असे असताना तीकडे तमिळनाडूत मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. याचे कारण आहे ते म्हणजे थलपती विजय. थलपती विजयने राजकारणात एन्ट्री केली असून, रविवार दि. २७ अॅाक्टोबर रोजी खुल्या मैदानावर सभा घेत इथला राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
अबब…३ लाखांच्यावर पब्लिक
साऊथचे सिनेमे जसे लोकप्रिय आहेत. तसं इथलं राजकारण वेगळ्या धाटणीचं आहे. सिनेमातील अनेक कलाकार इथल्या राजकारण एन्ट्री करताना आपण या अगोदर पाहिलेले आहेत. मात्र, विजयने त्याच्या नव्या तमिलगा विट्री कजगम या पक्षाची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करुन सगळ्यांचा अचंबित केलं होतं. आता तर त्याने पक्षाची पहिली जाहीर सभा घेत प्रस्थापित राजकारण्यांना जोराचा झटका दिला आहे. कोणत्याही नेत्याची सभा असल्यास फार फार तर काही हजारांवर लोक येतात. लयच झालं तर एखाद लाक पब्लिक येतं. पण विजयच्या सभेला तब्बल ३ लाखांच्या वर लोकं आली होती. भव्य दिव्य स्वरुपाची सभा काय असते आणि कशी असते याचं दर्शन विजयने घेतलेल्या सभेच्या माध्यमातून लक्षात येतं. २०२६ च्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून विजयने पक्षाची ही पहिली जाहीर सभा घेतली असल्याचं बोललं जात आहे.
प्रस्थापितांना TVK ची डोकेदुखी?
जनेतेच्या सेवेसाठी राजकारणात पाऊल टाकलं असल्याचे विजयने सांगितलं. तसेच पक्षाचा अजेंडा आणि दृष्टीकोणाबद्दल माहिती दिली. येथल्या सरकारवर हल्लाबोल चढवत करणानिधी यांच्यावर निशाणा साधला. राजकारण सिनेमा नाही तर युद्धाचे मैदाना असल्याचं त्यानं सांगितलं. TVK पक्ष हा द्रविड राष्ट्रवादाला महत्व देत असल्याचं स्पष्टीकरण विजयने जाहीर सभेच्या माध्यमातून दिलं. पक्षाची ध्येय धोरण सांगताना पक्षात महिलांना महत्व असल्याचं सांगितल्याने सभेला आलेल्या सर्वांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे आगामी काळात विजयचा TVK पक्ष प्रस्थापितांना जड जाणार असल्याचं भाकित इथले जाणकार व्यक्त करीत आहेत.