किकवी: भोर तहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या किकवी सजा संतर्गत असलेले किकवी ता.भोर येथील तलाठी कार्यालयाला नेथमीच टाळा लावलेला शेतकऱ्यांना पहायला मिळत असून याबाबत शेतकऱ्यांन मध्ये मोठी नाराजी दिसत आहे .
किकवी ता .भोर तलाठी कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून शासकीय कर्मचारी उपलब्ध नाही याच कारणाने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत असून त्या ठिकाणी असलेल्या कार्यालयाला नाही बोर्ड, ना तक्रार पेटी त्यामुळे ते नक्की तलाठी कार्यालय च आहे का? असा संभ्रम खतेदारांमध्ये निर्माण झाला आहे. किकवी तलाठी कार्यालयात मोठ्या प्रमाणात खातेदार येत असतात आणि तलाठी कार्यालयाचा असलेला टाळा पाहून निराशेने परत जात असल्याचे दिसत होते.
याबत किकवी तलाठी कार्यालयाचे तलाठी परमेश्वर जाधव यांच्याशी संपर्क केला असता, मी मागील मंगळवार पासून रजेवर आहे असे सांगितले.परंतु याचा फटका सर्व सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. शासकीय कामासाठी तलाठी कार्यालयाकडे धाव घेतली असता तलाठी कार्यालय बंद असल्याने त्यांच्या हाती निराशा येत आहे. यामुळे परिसरातील नागरिक प्रचंड संताप व्यक्त करत आहेत. तलाठी रजेवर असल्यावर वरिष्ठ मंडल अधिकाऱ्यांनी नागरिकांची सोय करायला हवी होती असे नागरिकांचे मत आहे.
किकवी तलाठी कार्यालयाच्या या भोंगळ कारभारामुळे किकवी तलाठी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या केंजळ, काळेवाडी, मोरवाडी, वागजवाडी, लोखरेवाडी येथील नागरिकांनची प्रचंड गैरसोय होत आहे. यावर खातेदारांनी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न उपस्थित होत आहे. लवकरात लवकर वरिष्ठ मंडल अधिकारी, कापूरहोळ यांनी नागरिकांची होणारी गैरसोय दूर करवी अशी नागरिकांची विनंती आहे.
या सर्व माहितीवरून नक्की चार्ज कोणाकडे? कोण आहे किकवी तलाठी? नक्की किकवी तलाठी कार्यालय आहे का? अशे अनेक प्रश्न समोर येत आहेत
समोर आलेल्या विषयावर नक्कीच विचार केला जाईल तसेच चार्ज कोणाकडे आहे याची पडताळणी केली जाऊन आजच तलाठी यांना किकवी तलाठी कार्यालयाचा चार्ज दिला जाईल याच्या सूचना मंडलाधिकरी यांना देण्यात येथील..
सचिन पाटील तहसीलदार भोर
किकवी शाखेतील तलाठी परमेश्वर जाधव हे रजेवर असून नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून आम्ही तात्पुरता सेवेचा चार्ज सारोळ्यातील तलाठी माधव केंद्रे यांच्याकडे दिला आहे.
पांडुरंग लहारे ,मंडल अधिकारी किकवी
माझ्याकडे सारोळा आणि भोंगवली हा चार्ज आहे. किकवी शाखेचा चार्ज माझ्याकडे नाही आणि किकवी सजा बाबतचे आशयाचे कोणतेही पत्र त्यांच्याकडे नाही.
– माधव केंद्रे तलाठी,सारोळा