खंडाळाः तालुक्यात शेती पंपाच्या विजेच्या होणाऱ्या लंपडावामुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड झाले असल्याने येथील शेतकरी या गैरसोयीमुळे वीज वितरण करणाऱ्या कंपनीवर नाराजी व्यक्त करीत होते. यामुळे तालुक्यात प्रस्तावित असणाऱ्या सर्व नवीन सबस्टेशनला येत्या १५ दिवसांमध्ये मंजूर देण्यात यावी, असे निवेदन महावितरणचे प्रोजेक्ट अधिकारी हरणे यांना मुंबई येथे भेटून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे.
शिवसेनेचे सातारा उपजिल्हा प्रमुख व जिल्हा नियोजन समिती सदस्य सातारा प्रदीपदादा माने, खंडाळा उपतालुका प्रमुख व मा. सरपंच खेड बु. सचिन धायगुडे पाटील, तालुका सचिव राऊत, लोणी गावचे ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब कदम यांनी प्रोजक्ट अधिकारी हरणे यांच्यासोबत चर्चा करुन येत्या १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना वीज मिळाली पाहिजे अशी चर्चा करुन निवेदन दिले.