पुरंदरः विजयकुमार हरिश्चंद्रे
पुरंदर तालुक्यातील नीरा नजिक असलेल्या गुळुंचे येथील ज्योतिर्लिंग देवाची काटेबारास यात्रा दि. १३ नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाली. “हर भोले हर हर महादेव” चा गजर करत अडीचशे होऊन जास्त भक्तगणांनी काट्यांच्या ढिगार्यामध्ये उड्या घेत ही काटेबारस यात्रा पार पडली. यावेळी यात्रेतील ही रोमांचकारी दृश्य याची देही याची डोळे पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक भाविकभक्त गुळूंचे येथे दाखल झाले होते.
कार्तिक शुद्ध प्रथमा या दिवशी म्हणजेच दिवाळीच्या पाडव्या दिवशी येथील ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये घटस्थापना करण्यात आली. या काटेबारस यात्रेला उत्सवाला सुरुवात झाली. आज पहाटे देवाला अभिषेक करण्यात आला. यानंतर ११ वाजता देवाची पालखी आपल्या बहिणीला आणण्यासाठी गेली. तर दुपारी १ वाजता ही पालखी पुन्हा मंदिरामध्ये आली. यानंतर काटे मोडवन यात्रेचा मुख्य उत्सवाला सुरुवात झाली. २५० हून अधिक भक्तगणांनी या काटेबारस यात्रेमध्ये काट्यांच्या ढीगामध्ये उड्या घेतल्या.
अगदी पाण्यात सूर मारावा अशा पद्धतीने काट्यांच्या ढिगार्यात उड्या मारणारे भक्तगण पाहून पाहणाऱ्याच्या अंगावर काटा आला नाही तर नवलच …! हे रोमांचकारी दृश्य पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी आले होते.आपल्या रुसलेला बहिणीला मनवण्यासाठी देवाने काट्याच्या ढीगामध्ये उड्या घेतल्या होत्या. अशी अख्यायिका याबाबत सांगितली जाते. तर 400 वर्षांपेक्षा जास्त मोठी परंपरा या यात्रेला असल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले जाते. या यात्रेतील कटेमोडवण पाहण्यासाठी सुमारे ५ हजार भाविकांनी उपस्थिती दर्शविली होती.