जेजुरीः जेजुरी एसटी स्थानकात एका महिलेचे मंगळसूत्र चोरी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरण महिलेने जेजुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. महिलेच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदर चोरीची घटना दि. १५ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एसटी स्थानकात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शारदा तानाजी गायकवाड (वय 61वर्ष व्यवसाय घरकाम रा. पुणे) यांनी जेजुरीत पोलिसांत फिर्याद दिली. दि. १५ डिसेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गायकवाड या जेजुरी एसटी स्थानकात असताना त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र किंमत पन्नास हजार रुपये चोरट्याने चोरुन नेले. अज्ञात चोरट्याचा जेजुरी पोलीस शोध घेत असून या प्रकरणाचा पुढील पोलीस हवालदार पवार हे करीत आहेत.