जेजुरीः अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीगडावर मार्तंड देवसंस्थानच्या लोगोचे अनावरण मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आले. चंपाषष्ठीचे औचित्य साधत लोगाचे (प्रतिकचिन्ह) अनावरण धर्मादाय सहआयुक्त, पुणे रजनी क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. देवसंस्थानने अनावरण केलेले प्रतिकचिन्ह सर्वांचे लक्ष वेधून घेत असून, खंडोबा देवाची पगडी आणि त्यात मल्हागड अशा सुबक पद्धतीने या लोगाचे अनाकरण करण्यात आले. क्षीरसागर मॅडम यांनी खंडेरायाचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी लोगो अनावरण समारंभ कार्यक्रमात देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अभिजीत देवकाते, विश्वस्त डॉ. राजेंद्र खेडेकर, मंगेश घोणे,ॲड. विश्वास पानसे,ॲड. पांडुरंग थोरवे, पोपट खोमणे, अनिल सौंदडे आदी उपस्थित होते.