जेजुरीः शहरात सामाजिक सलोखा जपत येथील समस्त मुस्लिम बांधवांच्या वतीने ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशी सणाच्या निमित्ताने गणेश भक्तांसाठी मसाला दूध वाटप करण्यात आले. मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद आणि अनंत चतुर्दशी हे दोन्ही सण एका दिवसाआड आल्याने याचे औचित्य साधत दोन्ही सणांच्या शुभेच्छा देण्यात आल्या. शहरातील उभ्या पेठेला असणाऱ्या हौदाजवळच्या येथे मसाला दूधाचे वाटप करण्यात आले.
जेजुरीमध्ये सामाजिक सलोखा व ऐक्य जपणारे दोन पवित्र सन एकत्र येण्याचा योग जूळून आल्याने जेजुरीमधील समस्त मुस्लिम बांधवांच्या हस्ते गणपती बाप्पाला हार घालण्यात आला. सदर कार्यक्रमाला जेजुरीतील समस्त मुस्लिम बांधव, समस्त जेजुरी ग्रामस्थ, सुवर्ण स्टार स्पोर्ट्स अँड सोशल क्लबचे पदाधिकारी, वंदे मातरम् संघटनेचे पदाधिकारी, माजी नगराध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक, पत्रकार बंधू, गणेश भक्त, खंडेरायाचे भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.