Friday, June 5, 2026
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय
No Result
View All Result
राजगड न्यूज (राजगड पब्लिकेशन प्रा.ली.)
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

जेजुरीः ट्रस्टीच्या मनमानी कारभारामुळे विजयादशमीचा मानकरी जेजुरीचा ऐतिहासिक ‘महाखंडा’ अद्यापही उपेक्षित; शस्त्राचा अवमान केल्याची नागरिकांनी व्यक्त केली खंत

४२ किलो वजनाची तलवार(खंडा) ३०० वर्षांपूर्वीची ऐतिहासिक परंपरा, शस्त्राला पत्र्याच्या पेटीत ठेऊन ट्रस्ट नेमके काय साध्य करु पाहतेः नागरिकांचा सवाल

by Team Rajgad Publication
October 3, 2024
जेजुरीः ट्रस्टीच्या मनमानी कारभारामुळे विजयादशमीचा मानकरी जेजुरीचा ऐतिहासिक ‘महाखंडा’ अद्यापही उपेक्षित; शस्त्राचा अवमान केल्याची नागरिकांनी व्यक्त केली खंत

जेजुरी: विजयकुमार हरिश्चंद्रे

विजयदशमी हा भारतभर साजरा होणारा लोकप्रिय सण असून या सणात शस्त्र पूजनाला फार महत्व दिले जाते. जेजुरीच्या खंडोबा गडावरील जगप्रसिद्ध असलेला महाखंडा ही तीनशे वर्षांपूर्वीची इतिहास कालीन तलवार आहे. त्यास खंडा या नावाने संबोधले जाते. या खंडाचे वजन तब्बल ४२ किलो आहे. यामुळे यास धार्मिक ऐतिहासिक महत्व प्राप्त असून देखील केवळ देवसंस्थान विश्वस्थानच्या मनमानी आणि अहंकारी भूमिकेमुळे सदर तलवार चक्क पत्र्याच्या पेटीत ठेऊन इतिहासाच्या शस्त्र, शास्त्र नितीचा अवमान केला असल्याची खंत मा. ट्रस्टी संदिपआप्पा जगताप, मल्हाराजे प्रतिष्ठान, समस्त ग्रामस्थ खान्देकरी मानकरी, गावकरी, रंभाई शिंपीन ट्रस्ट धालेवाडी आणि खंडा बहाद्दरांनी व्यक्त केली आहे.

You might also like

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

शस्त्राचा अवमान केल्याची खंत

मंदिराच्या लोक परंपरा संस्कृती याबद्दल सध्याच्या विश्वस्त कमिटीचे अज्ञान आणि राजकीय हितसंबधातून जेजुरी गडावर निवडून आलेले विश्वस्त मनमानी कारभारतून गडावर मागील ट्रस्टींनी या महाखंडाचे धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक महत्व पाहता उपलब्ध करून ठेवलेल्या मेघडंबरीत ही तलावर न ठेवता पत्र्याच्या पेटीतून ठेवून एक प्रकारे भारतीय शस्त्राचा अवमान करीत असल्याचे उघड झाले आहे.

खंडा पाहण्यासाठी विदेशी पर्यटक गडावर होतात दाखल

वास्तविक जेजुरी गडावरील हे ऐतिहासिक शस्त्र पाहण्याकरिता मॉरीशेष, रशिया, फ्रान्स, जर्मनी, जपान आणि इंग्लंड व इतर प्रदेशातून विदेशी पर्यटक येथे येत असतात. परंतु, भाषा न समजल्याने अथवा ट्रस्टींकडून याबतचे फलक नसल्याने त्यांना इतिहास ज्ञात होत नाही. याकरिता हिंदी, इंग्रजी, मराठी आणि इतर प्रादेशिक भाषेत या शस्त्राची माहिती फलक लावणे आवश्यक असल्याचे नागरिक पर्यटक भविकांचे म्हणणे आहे.

खंडा शस्त्रावर लघुपटाची निर्मिती

विशेषतः विजयादशमीला भारतीय शस्त्र आणि खंडोबा देवाचा नवसाला आलेला खंडा महत्वाचा असल्यामुळे या खंडा शस्त्राची विशेष पूजा करून चित्तथरारक कसरती करण्याची प्रथा आहे. यामध्ये कसरती आणि तोलून धरण्याच्या स्पर्धेमधून पारितोषिके दिले जातात. याबाबत जर्मनी हेंडलबर्ग युनिव्हरसिटीचे इतिहास अभ्यासक कै. डॉ. गुंठुर सोन्थ्यमार यांनी या तलवारीवर चाळीस वर्षापूर्वीं लघुपट देखील प्रसारित केला होता.

ट्रस्टींकडून जाणीवपूर्वक केले जातेय दुर्लक्ष?

या सर्व बाबी पाहता अनेक वेळा ट्रस्ट कमिटी जी ‘सेल्फी’ आणि ‘स्व:जाहिरातीत’ मग्न असते. ती या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या विश्वस्त व्हिआयपी आणि राजकीय व्यक्तींच्या खंडोबा दर्शन व्यवस्थेमध्ये मशगुल असून, मंदिराचा सांस्कृतिक विकास त्याचे सामाजिक धार्मिक महत्व, भाविक पर्यटक, सोय सुविधा, मंदिराच्या ग्राम विकासाकडे परंपरेकडे दुर्लक्ष करून व्हीआयपी आणि अधिकाऱ्यांच्या मर्जी सांभाळण्यात धन्यता मानत आहेत.

 अनमोल ठेवा दुर्लक्षित होतोय?

सदर खंडा 1763 ते 1766 च्या दरम्यान पुरंदरच्या ऐतिहासिक पानसे सरदार घराण्याने नवस पूर्ती म्हणून अर्पित केल्याचा इतिहास सांगितला जातो. अशा धार्मिक आध्यात्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या इतिहासिक शस्त्राला पत्र्याचे पेटीत ठेऊन ट्रस्ट नेमके काय साधते करु पाहते? हे समजू शकत नाही. याबाबात स्थानिक नागरिकांसह शासन धर्मदाय आयुक्तांनी लक्ष न दिल्यास महत्वपूर्ण ऐतिहासिक अनमोल असा ठेवा पत्र्यातून नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Tags: jejurikhandobamandirkhandarajgadnewstrasti
Team Rajgad Publication

Team Rajgad Publication

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत.. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे मधील कामासह राजगड न्यूज मध्ये संपादक म्हणून कार्यरत आहे.

Related Posts

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले
ताज्या बातम्या

सायकलच्या माध्यमातून जनजागृती करणारा अवलिया: शिवाजी गोगावले

December 18, 2024
आमच्या सगळ्यांचीच इच्छा…..; देवेंद्र फडणवीसांची शिंदेंना मंत्रीमंडळात सहभागी होण्याची साद, शिंदे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार?
ताज्या बातम्या

खातेवाटपासंदर्भात मोठी बातमीः शिवसेनेच्या वाट्याला ‘ही’ दोन अतिरिक्त खाती? खात्यांच्या मंत्र्यांची नावे अद्याप गुलदस्त्याच

December 18, 2024
Satara Crime News  गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई
कराड

Satara Crime News गावठी पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकाला सापळा सचून अटक; सातारा पोलिसांची मोठी कारवाई

December 18, 2024
बारामतीः भुजबळ समर्थकांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या घरासमोर घोषणाबाजी; ओबीसी समाजामध्ये नाराजीचा सूर कायम
ताज्या बातम्या

Bhujabal: तुमचा राग, दुःख व्यक्त करण्यास माझी मनाई नाही; पण…..भुजबळ स्पष्टच बोलणे

December 18, 2024
Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन
ताज्या बातम्या

Nagpur Adhivishan: कापूस, सोयाबीन, तूर पिकाला हमीभाव मिळावा; महाविकास आघाडीतील नेत्यांचे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन

December 18, 2024
Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल
क्राईम

Pune: येरवडा कारागृहात हाणामारीची घटना; घटनेत एकजण गंभीर, दोण जणांवर गुन्हा दाखल

December 17, 2024
Next Post
मंत्री छगन भुजबळांच्या ‘त्या’ उल्लेखाचा येसाजीराव कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक यांनी नोंदविला निषेध; म्हणाले……तुमच्या जातीय राजकारणासाठी

मंत्री छगन भुजबळांच्या 'त्या' उल्लेखाचा येसाजीराव कंक यांचे वंशज सिद्धार्थ कंक यांनी नोंदविला निषेध; म्हणाले......तुमच्या जातीय राजकारणासाठी

ताज्या बातम्या

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

भोर शहराला २४ तास पाणी मिळणार? की आश्वासन पुन्हा आश्वासनच राहणार?

June 5, 2026
राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

राजकारणातील भीष्मपितामहाला अखेरचा निरोप; मा. मंत्री अनंतराव थोपटे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

June 5, 2026
सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

सुरवडची तहान कायम! दोन विहिरी, दोन टाक्या तरीही ग्रामस्थ पाण्यापासून वंचित

June 4, 2026
दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

दुःखद बातमी : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंतराव थोपटे यांचे निधन; पुणे जिल्ह्यावर शोककळा

June 4, 2026
  • About Us
  • Contact Us
  • Epapar
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal Policy
  • Privacy Policy
  • Rajgad News

Copyright © 2026.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • शैक्षणिक
  • क्राईम
  • संपादकीय

Copyright © 2026.

WhatsApp us