सासवडः प्रतिनिधी खंडू जाधव
पुरंदर तालुक्यातील माध्यमिक विद्यालय यादववाडी येथील सहा विद्यार्थ्यांची निवड पंजाब येथे नॅशनल गतका क्रीडा स्पर्धेमध्ये झाली होती. या स्पर्धेत सई गणेश शिंदे, अबोली ताकवले, स्वराली कुमकर, ओम गणेश चोधरी, श्रवण बाळासो सटाले, श्रवण ताकवले अशी विद्यार्थ्यांची नावे आहेत.
या विद्यार्थ्यांनी पंजाब येथे जाऊन नॅशनल गतका क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्यामुळे तसेच सई गणेश शिंदे या विद्यार्थिनीने गतका क्रीडा स्पर्धेत टिम सिंगल सोटी क्रीडा प्रकारात सिल्व्हर मेडलवर आपल्या नावाची मोहर उमटली. त्यामुळे यादववाडी, हरगुडे, सटलवाडी, कांबळवाडी चोधरवाडी, करवंदेवस्ती, पिलाणवाडी, शिंदेवाडी, खेंगरेवाडी या परिसरातून सई गणेश शिंदे या विद्यार्थिनीवर अभिनंदनाचा वर्षांव करण्यात येत आहे.
तसेच या परिसरातील नागरिकांकडून सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे देखील अभिनंदन करण्यात येत आहे. यासाठी विद्यार्थ्यांना पंजाबला घेऊन जाण्यासाठी मुलीचे वडील व उद्योजक गणेश शिवाजी शिंदे व सटलवाडी गावचे माजी सरपंच गणेश मानसिंग चौधरी तसेच माध्यमिक विद्यालय यादववाडी येथील मुख्याध्यापक डी बी नेवासे सर, उपमुख्याध्यापक ताकवले सर, तांबोळे सर, रामणे मॅडम, निगडे सर, भोसले सर या सर्वांच्या सहकार्य लाभले. या सर्वांच्या मार्गदर्शनामुळे गतका क्रीडा स्पर्धेत सिल्वर मेडल जिंकल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे व त्यांच्या वडिलांचे अभिनंदन करण्यात येत आहे.