नवी मंबईः येथील बेलापूरमध्ये एका शुल्लक कारणावरून झालेल्या हाणामाराच्या घटनेमुळे शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने नऊ महिन्यांच्या बाळावर कुऱ्हाडीने वार केल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. बेलापूर येथील पंचशीलनगर या ठिकाणच्या झोपडपट्टीत ही घटना घडली आहे. बाळाच्या डोक्यावर आरोपीने कुऱ्हाडीने वार केले आणि यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला आहे. याप्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे परिसरात हळळ व्यक्त केली जात असून, एकप्रकारचे भीतीचे वातावरण तयार झाले आहे.