इंदापूर: प्रतिनिधी सचिन आरडे
राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, इंदापूरमधून महायुतीचे तिकीट कोणाला मिळणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. भाजपाचे हर्षवर्धन पाटील यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. पाटील इंदापूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र, महायुतीची जागा विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे.
राज्यात अनेक ठिकाणाी महायुतीमध्ये जागावाटपावरुन मोठे घमासान होणार असल्याचे सध्याचे चित्र आहे. इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील हे भाजपाकडून इच्छुक उमेदवार आहेत. येथून राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे अगामी काळात महायुतीकडून कोणाच्या नावावर शिक्कामोर्तेब होतो ते पाहणे महत्वाचे असणार आहे.
सुप्रिया सुळेंच्या विधानामुळे चर्चेला उधान
हर्षवर्धन पाटील हे राज्यातील मोठे नेते आहेत, ते लवकरच योग्य निर्णय घेतील. त्यांनी घेतलेला निर्णय हा राज्याचा हिताचा असेल, असे विधान सुप्रिया सुळे पत्रकारांशी संवाद साधताना केले आहे. त्यामुळे सुळेंच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.