इंदापूरः शिवकालीन मर्दानी खेळ असणारा लाठी काठी शिवदुर्गा प्रतिष्ठाण व अखिल भारतीय स्त्री शक्ती जागरण तर्फे संवर्धन करण्याचे कार्य गेली काही वर्ष सुरू आहे. त्यासोबतच जनजागृतीचे विविध उपक्रम ही स्थानिक पातळीवर राबवले जातात.‘स्त्री सक्षमीकरण’ हा मुद्दा लक्षात घेऊन शालेय, महाविद्यालयालयीन मुली, तसेच गृहिणी यांना लाठी काठी प्रशिक्षण देण्यात येऊन सक्षम करण्याचे प्रयत्न होणार आहेत.
घर आणि शाळा, कॉलेजचा अभ्यास सांभाळून रोजच्या धावपळीतून वेळ काढून ही कला शिकविण्याचे आणि शिकण्याचे कार्य इंदापूरमधील रणरागिणी करणार आहेत. ‘या लाठी-काठी प्रशिक्षणात सहभाग घेऊन स्वसंरक्षणासोबत एका पुरातन कलेच्या संवर्धनाचे कार्य पार पाडण्यास आम्हास सहकार्य करावे,’ असे आवाहन सीमा प्रशांत कल्याणकर (अध्यक्ष शिवदुर्गा प्रतिष्ठाण) यांनी केले आहे आहे. तालुक्यातील महिला, मुली यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे व नाव नोंदणी करावी असे आवाहन ही करण्यात आले आहे.
प्रशिक्षणासाठी साठी संपर्क ९८५०००१७५५/९०२२६६७४९४
प्रशिक्षण २० दिवस चालणार असून २ सप्टेंबरपासून सुरूवात केली जाणार आहे. रोज संध्याकाळी ५ ते ७ या वेळेत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा, असे सह- निमंत्रक राधिका जगताप यांनी सांगितले. यावेळी रूपाली रासकर, निर्मला जाधव, वैशाली शिंदे, योगिता शिंदे, कमल लोंढे उपस्थित होत्या.