वेल्हेः लक्ष्मण रणखांबे
येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था संविधान मंदिराचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात असल्याची माहिती औद्योगिक प्रशिक्षण संस्था वेल्हा प्राचार्य प्रतिभा चव्हाण यांनी दिली.
या उद्घाटनावेळी भारतीय जनता पार्टी वेल्हे तालुका अध्यक्ष आनंद देशमाने, ग्रामीण रुग्णालय वेल्हे येथील वैद्यकीय अधिकारी चंद्रकांत भोईटे, प्राचार्य प्रतिभा चव्हाण, पीडिलाईट इंडस्ट्रीजचे प्रशांत कांबळे, हिरपोडीचे सरपंच सोपान सुतार, शंकर कोडीतकर व चव्हाण एस आर, लोहोकरे ए एम, इंगवले, घोरपडे आदी कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य व रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था वेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान मंदिराचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारतीय संविधान या विषयावर प्राध्यापक राजेंद्र रणखांबे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. तर विद्यार्थ्यांसाठी वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.