नसरापूर, : आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते नसरापूर, केळवडे आणि कुरंगवडी या गावांमध्ये विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये ग्रामस्थ, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.
यावेळी नसरापुर कडून वेल्हे कडे जाणारा मुख्य रस्त्याची सुधारणा करणे या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. या कामासाठी सुमारे २५३ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. याचप्रमाणे, केळवडे येथे नवीन सत्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कुरंगवडी येथे नवीन रस्त्याचे व जल जीवन मिशन कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या कामासाठी २४५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.
उद्घाटन कार्यक्रमात बोलताना आमदार संग्राम थोपटे म्हणाले की, “मला ग्रामीण भागातील विकासासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. याच उद्देशाने मी या गावांमध्ये विविध विकास कामे पूर्ण केली आहेत. भविष्यातही मी ग्रामीण भागाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहीन.”
ग्रामस्थांनी आमदार संग्राम थोपटे यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, “आमदार थोपटे यांनी आमच्या गावांमध्ये अनेक विकास कामे पूर्ण केली आहेत. यामुळे आमच्या गावांचा कायापालट झाला आहे. या कार्यक्रमानंतर आमदार संग्राम थोपटे यांनी गावातील लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यांच्यावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रम प्रसंगी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शैलेश सोनवणे,वेल्हे तालुका काँग्रेस अध्यक्ष नाना राऊत,माजी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे,दिनकर धरपाळे,अमोल नलावडे,भोरचे माजी सभापती लहुनाना शेलार,माजी उपसभापती रोहन बाठे,राजगडचे उपाध्यक्ष पोपटराव सुके,संचालक शिवाजीराव कोंडे,अशोक शेलार,अरविंद सोंडकर,बाजार समिती सभापती आनंद आंबवले,वेल्हेचे माजी सभापती दिनकर सरपाले.नसरापूरच्या सरपंच सपना झोरे,उपसरपंच सुधीर वाल्हेकर,सदस्य संदिप कदम,इरफान मुलाणी,नामदेव चव्हाण,गणेश दळवी,रोहीणी शेटे,उषा कदम,मेघा लष्कर,अश्विनी कांबळे,श्रध्दा हाडके,ग्रामसेवक विजय कुलकर्णी यशवंत कदम,ज्ञानेश्वर झोरे,अनिल शेटे,शंकर शेटे,अनिल गयावळ,सोमनाथ उकिर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.