शिरवळ : श्री क्षेत्र आय्योध्या धाम येथे श्री राम मूर्ती प्राणप्रतीष्ठा निमित्त देशी व विदेशी दारू वाईन शॉप व मटण, चिकन, मच्छी विक्रेते तसेच नॉन व्हेज हॉटेल बंद ठेवण्याची मागणी जनता फाऊडेशन सदस्यांनी शिरवळ ग्रामपंचायतीकडे केली असून याबाबतचे निवेदन शिरवळ ग्रामपंचायतीला देण्यात आले आहे
श्री क्षेत्र आय्योध्या धाम येथे श्री राम मूर्ती प्राणप्रतीष्ठान उत्सव दि २२ रोजी होणार असून आपल्या शिरवळ गावामध्ये श्री राम मंदिर येथे मोठ्या उत्सवात साजरा होणार आहे. याच अनुषंगाने आपले काही कर्तव्य असून शिरवळ गावामध्ये कोणत्याही प्रकारचे देशी व विदेशी दारू वाईन शॉप व मटण, चिकन, मच्छी विक्रेते तसेच नॉन व्हेज हॉटेल बंद ठेवणे तसेच हॉटेल व ढाबा मालक यांना शिरवळ ग्रामपंचायतच्या वतीने सर्व गाव व शिरवळ परिसरामध्ये कळवण्यात यावे.
अशी विनंती जनता फाऊडेशनच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.