जेजुरीः शहरातील ग्रीन पार्क भागातील सप्तश्रृंगी नवरात्र उत्सव मंडळाने यंदाच्या वर्षी नारी शक्तीचा सन्मान म्हणून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मान केला. यामध्ये प्रामुख्याने शैक्षणिक, सामाजिक आदी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सहभाग होता. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फेत घेण्यात आलेल्या पीएसआय परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या जनक जावरे आणि निखिल राणे यांचा देखील मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला. मंडळाचे यंदाचे ७ वे वर्ष असून, दरवर्षी मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. या कार्यक्रमांना या भागातील नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभत असतो.
या कार्यक्रमात गायत्री बेलसरे, मोनाली दरेकर, अरुणा काकडे, प्रतिभा राणे या नारी शक्तींचा सन्मान करण्यात आला. तर जनक जावरे व निखिल राणे यांचा देखील सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात आला. यावेळी जेजुरी शहर शिवसेना विठ्ठल सोनवणे, अमोल बेलसरे मा. नगरसेवक अजिंक्य देशमुख, सामाजिक कार्यकर्ते रसिक जोशी, सागर शिंदे तसेच सप्तशृंगी नवरात्र उत्सव मंडळातील सुशीला म्हेत्रे, सुनिता पाटील, वर्षा राणे, वैशाली दिवेकर, महानंदा सुतार, रेणुका पवार तसेच महिलावर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मूर्ती लहान पण कीर्ती महान
या कार्यक्रमानंतर तालुक्यातील सुप्रिद्ध कीर्तनकार स्वप्निल महाराज काळाणे यांच्या सांर्पदायिक शिक्षण संस्थेत शिक्षण घेणाऱ्या श्री महाराज या लहानग्याने आपल्या व्याख्यानामधून आई-वडीलांचे महत्व विशिद केले. यावेळी उपस्थित असणारे सारेजण श्री महाराज यांच्या व्याख्यान तलीन होऊन ऐकत होते.