भोर-भोरमधील नागोबाआळी येथील मंदीरात मकर संक्रांतीनिमित्त उन्नती महिला प्रतिष्ठानकडून, विधवा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी जुन्या परंपरेला छेद देत, विधवा असल्याने समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या महिलांना हळदी कुंकवाचा, सुवासिनीचा मान देऊन सन्मान करण्यात आला.
विधवेच्या आयुष्यात सामाजिक सन्मान निर्माण करून मानसिक सक्षमीकरणं करणे ह्या उद्देशाने उन्नती महिला प्रतिष्ठानकडून ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या रितीरिवाजाला फाटा देत सामाजिक बदलाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ह्या प्रेरणादायी उपक्रमाद्वारे महिलांनी एक नवा अध्याय सुरु केला आहे. यादरम्यान हळदी कुंकू साठी उपस्थित असलेल्या विधवा (गंगा भागीरथी ) महिला त्यांच्या झालेल्या सन्मानाने भारावून गेल्या होत्या.
उन्नती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा तनपुरे, अरुणा कुमकर, संध्या झगडे, मनिषा पडवळ, भाग्यश्री वर्टे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या वेळी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. भोरमधील नागोबाआळी येथील मंदीरात मकर संक्रांतीनिमित्त उन्नती महिला प्रतिष्ठानकडून, विधवा महिलांसाठी हळदी कुंकू समारंभाचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी जुन्या परंपरेला छेद देत, विधवा असल्याने समाजाच्या प्रवाहापासून दूर राहणाऱ्या महिलांना हळदी कुंकवाचा, सुवासिनीचा मान देऊन सन्मान करण्यात आला. विधवेच्या आयुष्यात सामाजिक सन्मान निर्माण करून मानसिक सक्षमीकरणं करणे ह्या उद्देशाने उन्नती महिला प्रतिष्ठानकडून ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जुन्या रितीरिवाजाला फाटा देत सामाजिक बदलाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ह्या प्रेरणादायी उपक्रमाद्वारे महिलांनी एक नवा अध्याय सुरु केला आहे. यादरम्यान हळदी कुंकू साठी उपस्थित असलेल्या विधवा (गंगा भागीरथी ) महिला त्यांच्या झालेल्या सन्मानाने भारावून गेल्या होत्या.
उन्नती महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सीमा तनपुरे, अरुणा कुमकर, संध्या झगडे, मनिषा पडवळ, भाग्यश्री वर्टे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या वेळी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.