हडपसरः येथील एका उच्चभ्रू असलेल्या संस्थेच्या संचालक आणि प्राचार्याने त्यांच्याच महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यीनीचा विनंयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडित विद्यार्थ्यींने पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली म्हणून तिला विद्यालयातून काढून टाकण्यात आल्याची बाब आता समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा विद्यार्थीनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
हा संपूर्ण प्रकार संबंधित संस्थेच्या कार्यालयात अॅाक्टोबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत घडल्याची माहिती आहे. २२ वर्षीय पीडित तरुणी गावाहून शिक्षण घेण्यासाठी संबंधित संस्थेच्या विद्यालयात एमबीएच्या तिसऱ्या वर्षाला होती. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि संचालक याने तिला केबिनमध्ये बोलावले. तिच्यासोबत अश्लील चाळे केले असल्याचे फिर्यादीमध्ये पीडित तरुणीने सांगितले आहे. या फिर्यादीनुसार पोलिसांनी या दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थीने हडपसर पोलीस ठाणे गाठत पोलिसांना या प्रकरणी तक्रार देल्याचे कळताच ती गावी गेल्यानंतर तिचे शैक्षणिक कागदपत्रे तिच्या मूळ गावी पोस्टाने पाठवण्यात आली. यानंतर पीडितेने पुन्हा हडपसर पोलीस ठाणे गाठत पोलिसांना याबाबत माहिती दिली.
शेवाळवाडी येथील एका महाविद्यालयातील तरुणीने पोलीस ठाण्यात विनयभंगाची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार संबंधितांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीने १५ दिवसांपूर्वी याबाबत तक्रार दिली होती. या प्रकरणी विद्यार्थीनाल विद्यालयातून काढून टाकण्यात आल्याची माहिती मिळाली असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.
पोलीस निरीक्षक अमोल जगदाळे
या प्रकरणी संबंधित विद्यालयाच्या संस्थेने सांगितले की, संबंधित विद्यार्थी व तिच्या सहकाऱ्याने काही दिवासांपूर्वी विद्यालयात तोडफोड केली होती. याचे पुरावे विद्यालयाकडे आहेत. तसेच या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार तिला व तिच्या सहकाऱ्याला विद्यालयातून रिस्टिकेट करण्यात आले आहे. मुलीने पोलीस ठाण्यात जात चुकीची माहिती दिली असून, ब्लॅकमेल करीत असल्याचा आरोप संस्थेने केला आहे.