मुंबईः आदिवासी समाज्याच्या विविध मागण्यांकडे सत्ताधारी पक्ष दुर्लक्ष करीत असल्याचे म्हणत सत्ताधार पक्षातीलच आदिवासी आमदारांनी मंत्रालयातील तिसऱ्या मजल्यावरील गॅलरीमधून जाळीवर उड्या घेतल्या. यानंतर त्यांना तिथे असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बाहेर काढले आहे. मात्र, अशा प्रकारे सत्ताधारी पक्षातीलच आमदारांवर विविध मागण्यासाठी ही वेळ आली असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या आमदारांमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हे देखील होते. आमदारांना बाहेर काढल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणीच ठिय्या धरला. यावेळी झिरवाळ यांना अश्रू अनावर झाले होते.
आम्हाला घटनेने दिलेल्या अधिकारांची पायमल्ली करु नये, अशी विनंती मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याना आमदार किरण लहामटे यांनी केली. पैसा भरतीसाठी आदिवासी समाज्यातील विद्यार्थी येथे दाखल झाले असून, रस्त्यावर झोपत आहेत. त्यांच्या भेट कोणीही घेतलेली नाही. असे झिरवाळ यांनी सांगितले. त्यामुळेच आपण उड्डी घेतली असे देखील ते यावेळी म्हणाले. सत्ताधारी पक्षातीलच आदिवासी आमदारांनी आदिवासी तरुणांना नोकऱ्या कधी मिळणार, १५ दिवसांपासून अधिवासी विद्यार्थी त्यांच्या मागण्यासाठी ठिय्या धरुन आहेत, त्यांच्याकडे बघायला देखील कोणाला वेळ नाही अशी खंत झिरवाळ यांनी व्यक्त केली आहे. आता या प्रकरणी मुख्यमंत्री आणी दोन्ही उपमुख्यमंत्री काय निर्णय घेणार हे पाहाव लागणार आहे.