दत्तात्रय कोंडे| राजगड न्युज लाईव्ह
खेड – शिवापूर (वार्ताहार) दि.26 :- हॉटेल च्या ओपनिंग साठी तब्बल दहा ते बारा गावांमध्ये जाणारा सेवा रास्ता आठ तासांसाठी बंद ठेवण्यात आला होता.यामुळे स्थानिक नागरिकांची गैरसोय झाली. ओपनिंग साठी येणाऱ्या लोकांचा स्थानिक नागरिकांच्या अंगावर गाडी घालून दमदाटी करण्यात आली. पुणे सातारा महामार्गलगत असलेल्या सेवा रस्त्यावर एक खाजगी हॉटेल च्या उद्घाटनासाठी शनिवारी सायंकाळी सेलिब्रेटी येणार होते. त्यामुळे आठ तासंपासून हा सेवा रास्ता बंद करण्यात आल्याने खेड शिवापूर तसेच शिवगंगा खोऱ्यातील लोकांना तसेच स्थानिक नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठा मनस्थाप सहन करावा लागला. तसेच मुख्य रस्त्यावर कशाही गाड्या लावल्याने काही तास गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.
खेड – शिवापूर येथे पुणे सातारा रस्त्यालगत असलेल्या सेवा रस्त्याच्या कडेला शनिवारी सायंकाळी एक खाजगी हॉटेल चे उद्घाटन होते. या कार्यक्रमाची आयोजकांनी परवानगी घेतली. मात्र रस्ता बंद करण्यात येणार असल्याचा काहीही उल्लेख नसल्याने पोलिसांनी सांगितले दरम्यान उद्घाटनासाठी सेलेब्रिटी येणार असल्याने दुपारपासूनच पुणे सातारा महामार्गावरील मुख्य सेवा रस्ता बंद केला.त्यामुळे प्रवाशांना पीएमपीएल असेल, एसटी असेल हे कोंढानपूर फाट्याच्या पलीकडे एक स्टॉप वरती म्हणजेच खेड शिवापूर फाट्यावती उतरवत होते. त्यामुळे सुमारे एक कोलोमीटर ची पाय पिट प्रवाशांना करावी लागत होती. त्यामुळे कार्यक्रमानिमित्त आलेल्या अनेक मान्यवरांनी मुख्य रस्त्यावर वाहने लावल्यामुळे काही तास मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. हा प्रकार खेड शिवापूर पोलीस चौकी पासून पाचशे मीटर अंतरावर घडत असतानाही पोलीस प्रशासन मात्र संबंधित ठिकाणी फिरले सुद्धा नाही. या दरम्यान एखादी मोठी दुर्घटना घडल्यास त्याला कोण ? जबाबदार राहणार असे अनेक प्रश्न स्थानिकाकडून उपस्थित केले जात होते.
यासंबंधी राजगड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांना विचारले असता
खाजगी हॉटेल च्या उद्घाटनासाठी सेलिब्रेटी येणार असल्याने काही काळ रास्ता बंद करून तो पुन्हा सुरू करणार आहे. असे सांगितले
सार्वजनिक गणपती विसर्जन तसेच सार्वजनिक कार्यक्रम किव्हा इतर कोणतेही कार्यक्रमासाठी रस्ता बंद करण्याची मुभा न देता खाजगी समारंभाच्या कार्यक्रमासाठी परवानगी कशी देण्यात आली. हा मोठा प्रश्न उपस्थित होत असून राजगड पोलिसांनी सोयीस्कर दुर्लक्ष केल्याची चर्चा शिवगंगा खोऱ्यात सुरू आहे.