खेड शिवापूर : राजगड पोलिस स्टेशन अंकीत दि,२४ रोजी पुणे – सातारा महामार्गावर खेड शिवापूर टोल नाक्यावर राजगड पोलिस स्टेशन अंकित टोल नाका वाहतूक शाखेचे उद्घाटन पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या हस्ते करण्यात आले.
पुणे – सातारा महामार्गावर विजयादशमीचा मुहूर्त साधत राजगड पोलिस स्टेशन अंकित वाहतूक शाखेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन पोलीस निरीक्षक आण्णासाहेब घोलप यांच्या हस्ते दि २४ रोजी करण्यात आले.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक घोलप म्हणाले की पुणे – सातारा महामार्गावर असणारी वाहनांची ये जा होत असते.या महामार्गावर अपघातांचे प्रमाण ही मोठ्या प्रमाणावर आहे.राजगड पोलिस स्टेशन मधील पोलीस कर्मचाऱ्यांकडून तात्काळ मदत व्हावी, यासाठी पुणे-सातारा महामार्गावर खेड शिवापूर टोल नाका या ठिकाणी वाहतूक पोलीस शाखा सुरू करीत आहोत.
यावेळी महामार्ग प्रशासन अधिकारी व राजगड पोलिस स्टेशन चे खेडशिपुर चौकी इन्चार्ज सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ तसेच सहाय्यक फौजदार सुधीर खरतडे , पोलीस हवालदार किरवे, पोलीस हवालदार राहुल कोल्हे, पोलीस नाईक अमित कांबळे, पोलीस कॉन्स्टेबल निलेश ओहाळ , होमगार्ड पंकज शिंदे टोल मॅनेजर अनिल कुमार व इतर मान्यवर उपस्थित होते.