कवठे येमाई : कवठे येमाई (ता. शिरूर) येथे अस्वच्छता वाढली असून, तापाच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्याचा परिणाम रूग्णांच्या आरोग्यावर होत असून, डेंगू सदृश्य आजार होण्याची शक्यता बळावली आहे. यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीकडून औषध फवारणी करण्यात आली. नागरिकांनी देखील परिसराची स्वच्छता ठेवावी, असे आवाहन उपसरपंच उत्तम जाधव यांनी केले आहे.
परिसरात स्वच्छता ठेवली तर कोणत्याही रोगराईला शिरकाव करता येणार नाही. मलेरिया, डेंग्यू सदृश्य आजारावर नियंत्रणासाठी आपल्या घरात व परिसरात डास अळींची उत्पत्ती होणार नाही (Shirur News) याची नागरिकांनी काळजी घ्यावी. यासाठी कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन कवठे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नामदेव पानगे यांनी केली आहे.