हडपसरः सासवड रस्ता वडकी पवार मळा येथील एका गोडाऊनमध्ये काल मध्यरात्री सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेची माहिती अग्नीशमल दलाला मिळताच अग्नीशमल विभागाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी लागलेल्या आगीवर पाण्याचा फवारा केल्याने आग आटोक्यात आली. या घटनेत सुदैवाने जीवतहानी झाली नसली तरी मोठा आर्थिक फटका बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी पोहचलेल्या अग्नीशमल दलाच्या जवानांनी पाहिले की, पत्र्याचे शेड असलेले गोडाऊन पुर्णपणे आगीने वेढले गेले आहे. त्यांनी मुख्य दरवाजा अग्निशमन उपकरण वापरुन तोडून आतमध्ये प्रवेश केला. यानंतर चारही बाजूने पाण्याचा एकसारखा मारा सुरू केला. या पाण्याच्या माऱ्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांनी यश आले. मात्र या गोडाऊनमधील रद्दी, काचेच्या बाटल्या, मोबाईल बॅटरी, पुठ्ठा व इतर भंगार माल आगीत जळून खाक झाला आहे. तसेच एक दुचाकी देखील जळाली आहे. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकलेले नाही.
अग्नी शमल दलातील वाहनचालक उत्कर्ष टिळेकर, चंद्रकांत जगताप, प्रशांत मखरे तसेच तांडेल महेंद्र कुलाळ व जवान राजीव टिळेकर, सोमनाथ मोटे, राहुल दळवी, निलेश करणे, विकास गायकवाड, विजय चव्हाण, अजिंक्य खाडे हे सहभागी होते.