दौंड: (संदिप पानसरे)
भरधाव वेगाने जणाऱ्या रेल्वेच्या खाली आल्याने बिबट्याचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना दौंड तालुक्यातील यवत भागात घडली आहे. दि.३० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री ही घडल्याची माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. हा बिबट्या शिकारीच्या शोधात पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाडीची जोरदार धडक बसून यात बिबट्याचा मृत्यू झाला.
वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यवत येथे रेल्वे महामार्गे भरधाव रेल्वेच्या धडकेने बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना दि. ३० नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडल्याची खबर यवत येथील वन विभागाचे कर्मचारी वनपाल यांना मिळाली. त्यांनी मिळालेल्या माहितीनुसार दौंड तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी यांनी घटनास्थळी भेट दिली. अशी माहिती वनविभागाने दिली.
तसेच अधिकच्या माहितीनुसार, हा बिबट्या शिकारीचा शोध करताना पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या एक्सप्रेस गाडीने धडक दिली. या धडकेत बिबट्या मृत्युमुखी पडलेल्या बिबट्याचे दहन करण्यात येणार असल्याचे वनाधिकारी शिवकुमार बोंबले यांनी सांगितले.
परिसरात भीतीचे वातावरण
बोरी पारधी तालुका दौंड हद्दीत चिमुकल्या मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. वरवंड, पाटस, रोटी, पांढरेवाडी, कानगाव आणि भीमा नदी या परिसरात दिवसांदिवस बिबट्याची दहशत वाढत आहे. यामुळे शेतकरी व शेतमजूर यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.