Vidhansabha Election 2024 आज दुपारी तीन वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून, या परिषदेमध्ये जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसे पाहिले तर देशातील महाराष्ट्र, झारंखड, हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेचा कार्यकाल संपुष्टात येत आहे. मात्र, आज केवळ जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभेच्या तारीख आयोग घोषित करेल, अशी शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्र, झारखंड विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा नंतर जाहीर केल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक असणार आहे.
हरियाणा विधानसभेची मुदत ३ नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संपणार आहे. त्यामुळे तीन महिन्यापूर्वीच आचार संहिता लावण्याची शक्यता तशी कमीच असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.
महाराष्ट्र विधानसभेची मुदत २८ नोव्हेंबर पर्यंत आहे. दिवाळी १ ते ३ नोव्हेंबर च्या दरम्यान आहे.
त्यामुळे कदाचित दिवाळीनंतर महाराष्ट्रात निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दुपारी 3 वाजता निवडणूक आयोग काय घोषणा करते, याकडे आता राज्यातील सर्वांचेच लक्ष लागले आहे.