डोंबवलीः शहरातील रुनवाल माय सिटी या हाय प्रोफाईल भागातील दुहेरी मृत्यूमुळे मोठी खळबळ उडाली आहे. येथे राहणाऱ्या २९ वर्षीय विवाहितेने आपल्या पोटच्या अवघ्या २ वर्षांच्या मुलीची हत्या करुन स्वःताह आत्महत्या केल्याने या घटनेमुळे खळबळ माजली आहे. आत्महत्या केलेल्या महिलेने तिच्या २ वर्षांच्या मुलीच्या तोंडावर उशी ठेऊन तिची हत्या केली त्यानंतर तिने स्वःताह घरात गळफास घेत जीवन संपवल आहे, या घटनेमुळे येथील परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवीलमधील रुनवाल माय सिटी या हाय प्रोफाइल परिसरामधील पूजा राहूल सपकाळ (वय २९) या महिलेने तिच्या दोन वर्षांच्या मुलीला ठार करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. मयत पूजा हिने घरातील हॉलमध्ये तिच्या दोन वर्षांच्या चिमुकलीच्या तोंडावर उशी ठेवून तिचा जीव घेतला.
त्यानंतर तिने गळफास घेत स्वतःचे जीवनही संपवले आहे. या घटनेची माहिती डोंबिवली मानपाडा पोलिसांना मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत महिला पूजा हिने असे कृत्य का केले, तिच्या घरात काही तणाव होता का, तिचा पती यावेळी कुठे होता, यामध्ये काही घातपात झाला नाही ना, अशा सर्व बाजूंनी या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत. मायलेकीच्या मृत्यूमुळे परिसरात नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.
 
								 
                                
 
                                 
                                 
                                 
		





 
							










