जेजुरीः देशभरातील विविध मंदिर दिवाळीसाठी सजलेले पाहिले मिळत आहे. अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोब गडावर दिवाळीनिमित्ताने विद्युत रोषणाई करण्यात आली असून, गाभाऱ्यात देवाला फुलांची आकर्षण पद्धतीने सजावट करण्यात आली आहे. आज दिवाळी पाडवा असल्याने श्री मार्तंड देवसंस्थान विश्वस्त मंडळाने गडकोटावर खंडोबा देवाचे पुजारी वर्ग, समस्त खांदेकरी मानकरी, जेजुरीकर ग्रामस्थ, भाविक भक्त यांच्याकरिता दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून दिवाळी फराळ वाटप करण्यात आले.
यावेळी देवसंस्थानचे प्रमुख विश्वस्त अनिल सौंदडे, विश्वस्त मंगेश घोणे, विश्वस्थ ॲड. विश्वास पानसे यांच्या हस्ते फराळ वाटप करण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन देवसंस्थानचे व्यवस्थापक आशिष बाठे, अधिकारी व सेवेकरी वर्ग यांच्या वतीने करण्यात आले होते. दिवाळीनिमित्त श्री खंडोबा मुख्य मंदिर व गडकोटाला आकर्षक विद्युत रोषणाई व मुख्य मंदिर गाभाऱ्यामध्ये व बाहेरील बाजूस आकर्षक फुलांची सजावट करण्यात आल्याने गडावर नवचैतन्य निर्माण झाले आहे. पाडवा सण असल्याने गडावर मोठ्या प्रमाणावर देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक-भक्त दाखल झाले होते.