खंडाळा : तालुक्यातील धनगर समाजाने आरक्षणाच्या लढाई साठी पुणे सातारा आणी सातारा पुणे महामार्गा वरील पारगावच्या हद्दीत आंदोलन सुरू करुन सकाळ पासून महामार्गावरील वाहतुक पुर्ण पणे बंद पाडली आहे .त्या मुळे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे .गेल्या कित्येक वर्षां पासून राज्यातील धनगर समाजाने एकत्रीत येवुन राज्य सरकार कडे आरक्षणाची वेळो वेळी मागणी केली होती .त्या साठी अनेकदा आंदोलने मोर्चे आणी ऊपोषणे करुन राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न या समाजाने केला
प्रत्येक वेळी राज्य सरकारने फक्त आश्र्वासने दिली व वेळ काढू पणाचे धोरण अवलंबून  समाज बांधवांची 
फसवणूक केली आहे .त्या मुळे या समाजात सरकार विरोधात संतापाची लाट उसळली आहे .त्याचा राग व्यक्त करण्या साठी आज खंडाळा तालुक्यातील धनगर समाजाचे कार्यकर्ते बहुसंख्येने एकत्रीत येवुन खंडाळा तालुक्यातुन जाणारा मुंबई बेंगलोर आणी बेंगलोर मुंबई  महामार्ग क्र.४ वर ऊतरुन दोन्हीही महामार्गावरील वाहतूक रोखुन धरली आहे .त्या मुळे वाहतूक ठप्प होवुन वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत . 
याचा फटका प्रवाशांना बसल्याने त्याचे चटके सहन करत भर ऊन्हात प्रवाशी थांबले आहेत .
 
								 
                                
 
                                 
                                 
                                 
		





 
							









