राजगड न्युज नेटवर्क
नसरापूर: सामाजिक वारसा जपणाऱ्या मितभाषी व मायाळू स्वभावाने परिचित असणाऱ्या हरीश्चंद्री ( ता.भोर ) येथील सुलाबाई जगन्नाथ गाडे ( वय ७६ ) यांचे शनिवार ( दि. ७ ) रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या मागे दोन मुले व दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी सरपंच विकास गाडे यांच्या त्या मातोश्री तसेच माजी सरपंच संध्या राजेश गाडे यांच्या त्या सासू होत.