भोर: भांबवडे गावच्या प्रथम माजी महिला सरपंच कै. पद्मा रामचंद्र पवार यांचे अल्पशा आजाराने आज दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने गावावर शोककळा पसरली आहे.
रोखठोक बोलणं असल्यामुळे त्यांचा गावात मोठा दबदबा होता. तसेच गावच्या पहिल्या महिला सरपंच असल्याने सगळ्यात मिळून मिसळून त्या काम करीत होत्या. त्यांचा अंत्यविधी उद्या सकाळी ८ वाजता वैकुंठ स्मशानभूमी, भांबवडे येथे होणार आहे.