भोरः धांगवडी गावच्या हद्दीमधील एका जागेतून बांधकामसाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तूंची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी फिर्यादी गणेश दिलीप बारंगळे वय ३४ रा. भोर यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश बारंगळे यांचा कंट्रक्शनचा व्यवसाय असून, या कामासाठी लागणारे साहित्य त्यांनी धांगवडी गावच्या हद्दीत असलेल्या जागेवर ठेवले होते. या ठिकाणाहून लोखंडी प्लेपट, लोखंडी बार आदी बांधकामसाठीच्या साहित्याची चोरी झाली आहे. या चोरीत एकूण मिळून सत्त्याहत्तर हजार रुपये किंमतीच्या वस्तू चोरट्याने लंपास केल्या आहेत. या चोरी प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार निंबाळकर हे करीत आहेत.